हॉटेल ‘टू बीएचके’ला दणका; मद्यविक्रीचा परवानाच केला रद्द
१६ ऑक्टोबर २०२३ ला झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेला होता. त्यावेळी ब्रह्मपुरी परिसरातील वाढता मानव-वन्यजीव संघर्ष आणि या प्रकल्पाची संवेदनशीलता लक्षात घेऊन अभ्यास समिती नेमून निर्णय पुढे ढकलण्यात आला. या तीन सदस्यीय समितीने त्यांचा अहवाल तत्कालीन मुख्य
ताडोबातील वाघांची संख्या वन्यजीव रक्षकांना सादर केला. त्यानंतर हा अहवाल आणि प्रस्ताव २४ जानेवारी २०२४ ला राज्य वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीसमोर मांडण्यात आला. या समितीनेही या प्रकल्पाला स्पष्ट नकार दिला होता.
राज्य वन्यजीव मंडळाच्या तज्ज्ञ सदस्यांचा विरोध डावलत राज्य सरकारने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंवेदनशील वन्यजीव कॉरिडॉरमध्ये प्रस्तावित लोहखनिज प्रकल्पाला मंजुरी दिली. यामुळे वाघांसह राज्यातील सर्वाधिक वन्यजीव घनतेच्या संवर्धनावर गंभीर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. याचसंदर्भातील इशारा तज्ज्ञ मंडळींनी राज्य सरकारला दिला होता. मात्र हा विरोध डावत राज्य सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदिल दाखवला आहे. भारतामधील सर्वाधिक वाघ असलेल्या राज्यांमध्ये समावेश होत असलेल्या महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमी आणि वन्यजीवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जातोय.
कुठे होणार खाण प्रकल्प?
ब्रह्मपुरी तालुक्यातील लोहाडोंगरी गावापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेला हा प्रकल्प डोंगर काचेपार राखीव जंगलात येतो. २०१९ मध्ये नागपूरस्थित एका पोलाद कंपनीने हा लोखंड खनिज ब्लॉक लिलावात मिळवला. हा खाण प्रकल्प ब्रह्मपुरी वन विभागातील कक्ष क्रमांक ४३९ मध्ये प्रस्तावित असून त्यासाठी सुमारे ३६ हेक्टर समृद्ध वनजमिनीचे वळण अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, या खाण ब्लॉक परिसरात वाघ, बिबट्यांसह इतरही वन्यप्राणी आहेत. लोहप्रकल्पामुळे वाघांसह राज्यातील सर्वाधिक वन्यजीव घनतेच्या संवर्धनावर गंभीर दुष्परिणाम होणार आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात झाल्यावर त्याचा परिणाम किती घातक ठरू शकतो, हे येणारा काळच सांगेल.
ताडोबातील वाघांची संख्या
ताडोबाचे एकूण क्षेत्रफळ १७२७ चौ. किमी. असून त्यातील ११०२ चौ. किमी. हे संरक्षित क्षेत्र आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोअर भागात सुमारे ६० व बफर झोनमध्ये १५ वाघ आढळले आहेत. हे सर्वेक्षण ‘वाइल्डलाइफ कॉझर्वेशन ट्रस्ट’ तर्फे कॅमेरे लावून करण्यात आले होते.
Ans: हा प्रकल्प ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंवेदनशील वन्यजीव कॉरिडॉरमध्ये असून वाघांच्या अधिवासावर गंभीर परिणाम होणार आहे.
Ans: राज्य वन्यजीव मंडळ आणि त्याच्या स्थायी समितीने प्रकल्पाला स्पष्ट नकार दिला होता.
Ans: ब्रह्मपुरी तालुक्यातील लोहाडोंगरीपासून 15 किमी अंतरावर, डोंगर काचेपार राखीव जंगलात.






