नवीन वर्षात फक्त 75 रुपयांत करा शिमल्याची सैर
ख्रिसमस आणि नवीन वर्षात लोक शिमलाला सर्वात जास्त भेट देतात, कारण हे एक असे ठिकाण आहे जिथे नेहमीच सुंदर वातावरण आणि पार्टीचा माहोल असतो. तसेच इथे हिवाळ्यातील बर्फाच्छादित वातावरणाचा एक अद्भुत अनुभव घेता येतो. सध्या हिवाळ्याचा ऋतू सुरु आहे, या मोसमात आता इथे खूप बर्फवृष्टी झाली आहे, ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या दिवशी आपल्या कुटुंबासह भेट देण्यासाठी हे एक सर्वोत्तम ठिकाण आहे.
आता शिमल्याला जायचे म्हणजे एक खास बजेट असायला हवे. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, आता शिमल्याची सैर करण्यासाठी तुम्हाला बजेटची काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक आनंदाची बातमी, याबद्दल जाणून घेताच तुम्ही आनंदाने उड्या मारू लागाल. आम्ही कालका-शिमला रेल्वेबद्दल बोलत आहोत ज्याच्या ट्रॅकवर विशेष हॉलिडे ट्रेन सुरू करण्यात आली आहे. ही ट्रेन शुक्रवारपासून सुरू झाली होती, ज्यामध्ये पहिल्या दिवशी 85 प्रवासी शिमला पोहोचले होते. चला या ट्रेनविषयी थोडं सविस्तर जाणून घेऊयात.
ट्रेनची वेळ
कालका येथून शुक्रवारी सकाळी 8:05 वाजता ही ट्रेन सुरू झाली आणि दुपारी 1:40 वाजता शिमला येथे पोहोचली. चांगली गोष्ट म्हणजे ही ट्रेन 28 फेब्रुवारीपर्यंत धावणार आहे, यापूर्वी 5 ट्रेन शिमलासाठी येत होत्या. आता हॉलिडे स्पेशल सुरू झाल्यानंतर ही संख्या 6 झाली आहे. सर्व गाड्या पर्यटकांनी भरून येत आहेत.
ट्रेनमध्ये पूर्ण 7 डब्बे
ट्रेनच्या दोन जनरल डब्यांमध्ये प्रति व्यक्ती 75 रुपयांपर्यंत भाडे आकारले जाईल. विस्टाडोमच्या दोन डब्यांमध्ये प्रति प्रवासी भाडे 945 रुपये असेल आणि प्रथम श्रेणीच्या दोन डब्यांमध्ये प्रति प्रवासी भाडे 790 रुपये असेल. ट्रेनमध्ये सात डबे आहेत. कालका-शिमला रेल्वे मार्गावर 103 बोगदे आणि छोटे-मोठे पूल आहेत, ज्यामुळे तुमचा प्रवास खूपच रोमांचक होईल.
दरवर्षी येथे असते हजारो पर्यटकांची वर्दळ
ख्रिसमस आणि नववर्ष साजरे करण्यासाठी अनेक पर्यटक शिमल्यात येत आहेत. व्हाइट ख्रिसमसमुळे पर्यटक या हिल स्टेशनची निवड करत आहेत. शेजारील राज्यातूनही हजारो लोक आल्हाददायक हवामान आणि स्वच्छ हवेचा आनंद घेण्यासाठी शिमल्यात पोहोचतात. शिमला, हिमाचलमध्ये ऑक्टोबरपर्यंत राज्यात 1.52 लाख पर्यटक आले असून डिसेंबर महिन्यात 20 लाख पर्यटक शिमल्यात पोहोचण्याची अपेक्षा आहे, जो गेल्या 5 वर्षातील सर्वात जास्त आहे. शिमल्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे, लोक छत्री घेऊन बर्फवृष्टीचा आनंद घेत आहेत, तर काहीजण शेकोटी पेटवून हिमवर्षावाचा आनंद घेत आहेत. परंतु लोकांना हवामान पाहूनच शिमला गाठण्याचा सल्ला दिला जात आहे, कारण येत्या काळात येथे आणखीन जास्त बर्फवृष्टी होऊ शकते.
फ्लाइटने:
रेल्वेने :
रस्ता मार्ग: