अनेकांना आपल्या स्वप्नातील जगात जाण्याची इच्छा असते. एक असे ठिकाण जे शांततेने आणि सुंदरतेने भरलेले असेल, जिथे फुलांचा मोहित सुंगंध दरवळत असेल… तुम्हालाही अशा ठिकाणी सत्यात जायची इच्छा असेल तर तुमची ही इच्छा नक्कीच पूर्ण होऊ शकते. मुख्य म्हणजे, असे ठिकाण तुम्हाला कोणत्या परदेशी नाही तर भारतातच पाहायला मिळत आहे. होय, हे खरे आहे. आज आम्ही आज आम्ही तुम्हाला अशाच एका ठिकाणी घेऊन जाणार आहोत, जिथले दृश्य कोणत्या स्वर्गाहून कमी नाही. या जागी तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एक चांगला वेळ घालवू शकता.
जर तुम्हाला स्वर्ग पाहायचा असेल, तर भारतातील सर्वात प्रसिद्ध व्हॅलीला नक्कीच भेट द्यायला हवी. या व्हॅलीचे नाव व्हॅलीऑफ फ्लॉवर्स असून ती उत्तराखंडमध्ये वसलेली आहे. येथे तुम्हाला 300 हून अधिक प्रकारची फुले पाहायला मिळतील. हे ठिकाण तुमच्या सहलीला मोहिनी घालेल. आमच्यावर विश्वास ठेवा, या जगसारखे अद्भुत दृश्य तुम्ही भारतात कुठेही पाहिले नसेल. येथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत रोमँटिक स्टाईलमध्ये फोटोशूट देखील करू शकता.
हेदेखील वाचा – Friendship Day 2024: मैत्रीचा दिवस करा खास आणि आपल्या मित्रांसोबत ‘या’ निसर्गमय ठिकाणांना जरूर भेट द्या
या जागेला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे हिवाळा आणि पावसाळा. इथे जर तुम्ही गेलात तर तुम्हाला आता या ठिकाणीच स्थायिक व्हावे, असे वाटू लागेल. इतके अविस्मरणीय दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते. व्हॅली ऑफ फ्लॉवर्सचे दृश्य पाहण्यासाठी तुम्हाला प्रति व्यक्ती 150 रुपये मोजावे लागतील. 1 जूनपासून व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पर्यटकांसाठी खुली करण्यात आली होती, जी आता 31 ऑक्टोबरला पुन्हा बंद होणार आहे.
उत्तराखंड व्यतिरिक्त, तुम्ही शिमला, हिमाचल प्रदेश येथे अनेक फ्लॉवर व्हॅली पाहू शकता. येथे तुम्हाला रोझ गार्डन, ट्युलिप गार्डन अशा अनेक ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळेल. एवढेच नाही तर जोडीदारासोबत रोमँटिक क्षण तुम्ही दार्जिलिंगला जाऊ शकता.
इतकेच नाही तर, इथे तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात रात्र काढायची असेल तर तुम्ही इथे कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकता. तारांनी भरलेल्या आकाशाखाली फुलांच्या बिछान्यात घालवलेली रात्र स्वर्गापेक्षा कमी वाटणार नाही. नवीन लग्नानंतर तुम्ही दोघे पती-पत्नी पृथ्वीवर स्वर्गाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणाला भेट देऊ शकता.