प्रवास प्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतीय रेल्वे आणि IRCTC आणत आहेत चालते-फिरते 7-स्टार हॉटेल! शाही थाटाने सुसज्ज तुमची प्रत्येक रॉयल इच्छा आता ट्रेनमध्ये पूर्ण होणार. प्रवास करता करता आता तुम्ही लग्झरी गोष्टींचा आनंद उचलू शकता. होय, तुम्ही बरोबर वाचले! तुम्हाला स्पामध्ये स्वत:ला ताजेतवाने करायचे असले, जिममध्ये घाम गाळायचा असेल किंवा बारमध्ये बसून वाईन आणि बिअरचा आनंद लुटायचा असेल, आता या सर्वच गोष्टी तुम्हाला कोणत्या हॉटेलमध्ये नाही तर भारतीय रेल्वेमध्ये अनुभवता येणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो, डिसेंबर ते मार्च या वेगवेगळ्या तारखांना धावणाऱ्या या ट्रेनचे बुकिंग आता सुरू करण्यात आले आहे. चला या ट्रेनविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कर्नाटकच्या रॉयल ट्रेनमध्ये प्रत्येक सुविधा
या रॉयल ट्रेनमध्ये 13 डबल बेड केबिन, 26 ट्विन बेड केबिन आणि एक विशेष दिव्यांग केबिन आहे. प्रत्येक केबिनमध्ये एयर कंडीशनिंग, वाय-फाय, उत्तम फर्निचर आणि लग्झरी बाथरूम आहेत. याशिवाय, एक सलून देखील आहे जिथे तुम्ही स्वतःला ग्रूम करू शकता. पाच रात्र आणि सहा दिवसांच्या या प्रवासात तुम्हाला कर्नाटकची संस्कृती, इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवता येईल.
Year Ender 2024: वर्षभरात टॉप सर्चमध्ये राहिली भारतातील ही 5 ठिकाणे, तुम्ही भेट दिली की नाही?
हा प्रवास आयुष्यभर संस्मरणीय राहील
गोल्डन रथ ही अतिशय आरामदायी आणि आलिशान ट्रेन आहे. या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या लोकांना राजा-सम्राट असल्याचा फील येतो. या ट्रेनमध्ये जेवणाची खूप काळजी घेतली जाते. यात दोन रेस्टाॅरंट आहेत एक म्हणजे ‘रुची’ आणि दुसरे ‘नालापक’, इथे तुम्ही अतिशय चवदार शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. हे पदार्थ अतिशय शाही थाटात तुम्हाला सर्व्ह केले जातील.
येथे तुम्ही विविध प्रकारच्या वाईन्सचा देखील आनंद घेऊ शकता. या ट्रेनमध्ये पर्यटकांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाते. यात एक स्पा आणि जिम देखील आहे जिथे तुम्ही आराम आणि व्यायाम करू शकता. यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षेसाठीही अनेक व्यवस्था करण्यात आल्या आहेत. या लक्झरी ट्रेनमध्ये 5 रात्री आणि 6 दिवस घालवून, तुम्ही दक्षिण भारतातील काही सुंदर ठिकाणे कव्हर करू शकता.
ट्रेन भाडे
₹4,00,530/- (पाच रात्री आणि सहा दिवस)
5% GST अतिरिक्त
सर्व खर्च समाविष्ट आहेत: निवास, भोजन, पेय, प्रवेश तिकिटे, गाइड
Year Ender 2024: यावर्षी जोडप्यांचे सर्वात आवडते हनिमून डेस्टिनेशन बनली ही 5 ठिकाणं
कर्नाटकची शान: बेंगळुरूपासून बांदीपूर, म्हैसूर, हलेबिडू, चिकमंगळूर, हम्पी, गोवा आणि परत बंगळुरूपर्यंत
दक्षिणेतील रत्ने: बेंगळुरूपासून म्हैसूर, कांचीपुरम, महाबलीपुरम, तंजावर, चेट्टीनाड, कोचीन, चेरथला आणि परत बेंगळुरूपर्यंत
ट्रिपचे शेड्युल
अधिक माहितीसाठी
वेबसाइट: www.goldenchariot.org
ईमेल: goldenchariot@irctc.com
फोन: +91 8585931021