मानवाने कितीही प्रगती केली असली तरी वेळ ही एक अशी गोष्ट आहे, जिच्यावर आजवर कोणीही नियंत्रण मिळवू शकलं नाही. असे म्हणतात की, वेळ ही एक अशी गोष्ट आहे जी कुणाच्याही हातात नाही, वेळेला थांबवता येत नाही. अशात तुम्ही विचार जरा जर वेळेच अस्तित्वात नसेल तर… वेळच नसेल तर नेमकं काय होईल? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? आपल्या कल्पनेपलीकडील हे गोष्ट खरी आहे. प्रत्यक्षातच वेळेना न जुमानणारं एक ठिकाणही या जगात अस्तित्वात आहे. हे ठिकाण नॉर्वेमध्ये (Norway) आहे , इथे असं एक असं बेट आहे, जिथे वेळ ही संकल्पनाच कोणी पाळत नाही, ज्यामुळे इथे दिवस आणि रात्रसुद्धा अस्तित्वात नाही. वेळचे अस्तित्व नसणाऱ्या या ठिकाणाचे नाव समरॉय (Samroy) आहे.
नॉर्वेच्या किनापट्टी क्षेत्रात हे ठिकाण वसले आहे. जगाच्या नकाशावरील, मानवी हस्तक्षेपापासून दुस असणारे हे ठिकाण एक दुर्मिळ आहे. आर्क्टिक वर्तुळाच्या वरच्या बाजूस असणाऱ्या या बेटावर 69 दिवस सतत सूर्यप्रकाश असतो, इथे या दिवसांना वसंत ऋतूचे दिवस म्हटले जाते. त्याप्रमाणे इथे तितकीच कडाक्याची आणि मोठी थंडीसुद्धा असते, जी रक्त गोठवण्यासाठी पुरेशी आहे.
या बेटाने 2019 साली जगभरातील लोकांचे लक्ष आपल्याकडे खेचत जगाच्या नकाशावर आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. यास कारणाभूत ठरली ती म्हणजे एक अशी कल्पना ज्याअंतर्गत पारंपरिक 24 तासांची कालमर्यादा / घड्याळ इथे नाकारण्यात आले. पर्यटनाच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल ठरले. या संकल्पनेअंतर्गत इथे 300 कुटुंब कशा पद्धतीने कोणत्याही वेळेच्या मर्यादेशिवाय वास्तव करत आहेत, ते दाखवण्यात आलं.
इथे स्तहनिक लोक खेळताना, पोहताना आणि हायकिंग करताना दिसून येतात. जगाच्या वेळेनुसार बोलायचे झाले तर, रात्री उशिरापर्यंत इथे सुरूच असते. उशीरपर्यंत इथे सर्व गोष्टी सुरु असतात. मध्यरात्रीही इथे लोकांची गर्दी पाहायला मिळते. निरभ्र आकाश, स्वच्छ पाणी, रंगीत टुमदार घरं आणि रात्री आकाशात दिसणारा रहस्यमयी, जादुई प्रकाश या सर्वच गोष्टींनी युक्त हे ठिकाण फिरण्यासाठी एक सुंदर आणि अद्भुत ठिकाण आहे. जगापासून दूर तुम्हाला एका शांत आणि निसर्गमय ठिकाणाला भेट द्यायची असेल तसाच काही नवीन किंवा अविश्वसनीय असा अनुभव घ्यायचा असल्यास तुमच्यासाठी हे ठिकाण आहे सर्वोत्तम पर्याय ठरेल.