(फोटो सौजन्य – Pinterest)
प्रवास कुणाला आवडत नाही. सुट्ट्या सुरु झाल्या की, सर्वांचाच फिरण्याचा प्लॅन बनतो. आयुष्यात एकदा तरी परदेशी पर्यटन करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते मात्र अफाट बजेटमुळे आपल्याला ते करता येत नाही. अशात आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात सुंदर पर्यटन ठिकाणाविषयी माहिती सांगत आहोत, जिथे तुम्ही स्वस्त दरात भेट देऊ शकता. हे ठिकाण म्हणजे व्हिएतनाम इथे भारतीयांना आगमणानंतर व्हिसा दिला जातो. विमान तिकिटांबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही व्हिएतजेट एअरने फक्त १८५६ रुपयांमध्ये व्हिएतनामला पोहोचू शकता. व्हिएतजेट एअर दिल्ली, मुंबई, कोची, अहमदाबाद इत्यादी ठिकाणांहून व्हिएतनाममधील हनोई, हो ची मिन्ह सिटी, दा नांग सारख्या शहरांसाठी थेट फ्लाइट चालवते. तिकीट बुक करण्यासाठी तुम्ही https://www.vietjetair.com वेबसाईटला भेट देऊ शकता. इथे तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्सबद्दल माहिती मिळू शकते.
व्हिएतजेट एअर वेळोवेळी अनेक ऑफर्स आणत असते. या ऑफर्समुळे तिकिटाचे भाडे खूपच कमी होते. जर तुम्ही ५ मे रोजी दिल्लीहून हो ची मिन्ह सिटीचे तिकीट बुक केले तर तुम्हाला फक्त $२१.८४ म्हणजेच १८५६ रुपयांना तिकीट मिळेल. १ मे चे थेट विमान तिकीट ३५७० रुपयांना उपलब्ध आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, व्हिएतजेट ही एक बजेट एअरलाइन आहे, त्यामुळे सामान आणि जेवणाचे शुल्क सामान्यतः मूळ भाड्यात समाविष्ट केले जात नाही. म्हणून, कोणतीही ऑफर निवडण्यापूर्वी, त्याच्या अटी काळजीपूर्वक वाचणे महत्वाचे आहे.
व्हिएतनाम हे आग्नेय आशियातील एक आकर्षक पर्यटन स्थळ आहे, जे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी, समृद्ध संस्कृतीसाठी, ऐतिहासिक स्थळांसाठी आणि चवदार पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. त्यात सुंदर समुद्रकिनारे, पर्वत, प्राचीन शहरांपासून ते आधुनिक महानगरांपर्यंत सर्व काही आहे. भारतातून विमानाने व्हिएतनामला पोहोचण्यासाठी सरासरी ४ ते ५ तासांचा वेळ लागतो. व्हिएतनाम भारतीय नागरिकांना व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा पुरवते. व्हिएतनामला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ नोव्हेंबर ते जून दरम्यानचा आहे. याकाळात येथील हवामान आल्हाददायक असते.
व्हिएतनामची राजधानी हनोई आहे, जी तिच्या प्राचीन संस्कृती आणि फ्रेंच वास्तुकलेसाठी ओळखली जाते. हो ची मिन्ह सिटी हे व्हिएतनाममधील एक प्रसिद्ध शहर आहे. येथील नाईटलाइफ आणि शॉपिंग खूप आकर्षक आहे. फु क्वोक हे व्हिएतनामचे सर्वात मोठे बेट आहे, जे त्याच्या पांढऱ्या वाळूच्या समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि प्रवाळ खडकांसाठी प्रसिद्ध आहे. व्हिएतनामी चलन डोंग (VND) आहे. भारताचा १ रुपया साधारण ३०० व्हिएतनामी डोंगच्या बरोबरीचा आहे. व्हिएतनाममधील पर्यटन उद्योग वेगाने वाढत आहे. २०२५ मध्ये २ कोटी पर्यटक व्हिएतनामला भेट देण्याची अपेक्षा आहे. भारतीयही मोठ्या संख्येने व्हिएतनामला जात आहेत. २०२३ मध्ये भारतीय पर्यटकांची संख्या १.३७ लाख होती, जी २०२५ मध्ये दोन लाखांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.