New Year Celebration: न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी प्रत्येक वेळी गोव्यालाच का जायचं? भारतातील हे 5 बीचही आहेत परफेक्ट
येत्या काही दिवसांतच 2024 वर्ष संपणार आहे. सरत्या वर्षाचा निरोप घेण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी लोकांनी अनेक प्लॅन तयार करण्यास सुरुवात केली आहे. नवीन वर्षाची सुरुवात कशी करायची आहे, यासाठी लोकांचं नियोजन सुरु झालं आहे. नवीन वर्षांचं स्वागत म्हटलं तर अनेकजण गोव्याला जाण्याचा प्लॅन करतात. कारण गोव्यामधील नवीन वर्षाच्या स्वागताची पार्टी खूप प्रसिध्द आहे. येथील बीचवर लोक खूप एन्जॉय करतात. गोव्याचा बीच नवीन वर्षाच्या पार्टीसाठी योग्य आहे. अनेकांनी येथे नववर्ष साजरे करण्याचे बेतही आखले आहेत. पण दरवर्षी नवीन वर्षांचं स्वागत करण्यासाठी गोव्यालाच का जायचं?
नववर्षाला येथे एवढी गर्दी असते की, पाय ठेवायलाही जागा नसते. फ्लाइटपासून हॉटेलपर्यंतच्या खोल्यांचे दर प्रचंड वाढलेले असतात. अशा परिस्थितीत आपला प्रचंड खर्च होतो. पण आता आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही समुद्रकिनाऱ्यांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही नवीन वर्षाची पार्टी करू शकता. इथे तुम्ही कुटुंब, मित्र, प्रेयसी कोणासोबतही जाऊ शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कर्नाटकातील गोकर्ण हे एक परिपूर्ण ठिकाण आहे. हे ठिकाण शांतता आणि सौंदर्यासाठी ओळखले जाते. येथे तुम्ही ओम बीच, कुडले बीच आणि हाफ मून बीचवर नवीन वर्षाची पार्टी साजरी करू शकता. येथील सौंदर्य तुमची नवीन वर्षाची पार्टी अविस्मरणीय बनवेल. येथे तुम्हाला फोटो क्लिक करण्यासाठी एक चांगले दृश्य देखील मिळेल. तुम्ही येथे सेल्फी, ग्रुप फोटो घेऊ शकता.
अंदमानच्या राधानगर बीचची गणना आशियातील सर्वात मोठ्या समुद्रकिनाऱ्यांमध्ये केली जाते. नवीन वर्षाचा आनंद लुटण्यासाठी येथे पांढरे वाळवंट, स्वच्छ पाणी आणि हिरवळ अशा अनेक गोष्टी आहेत. यामुळे तुमची नवीन वर्षाची पार्टी अधिक मजेदार होणार आहे. इथे गर्दी खूप कमी दिसेल. नवीन वर्षात तुम्ही येथे अनेक वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता.
कन्याकुमारी बीचवर अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर एकत्र येतात. नवीन वर्षात तुम्ही येथे सूर्योदय आणि सूर्यास्ताचे सुंदर दृश्य पाहू शकता. दरवर्षी येथे नववर्ष साजरे करण्यासाठी लोकांची गर्दी असते. हे ठिकाण इतके सुंदर आहे की तुम्ही इथल्या सौंदर्यात हरवून जाल.
तुम्हाला तुमचं नवीन वर्ष एखाद्या शांत ठिकाणी साजरं करायचं असेल तर तुमच्यासाठी गुजरातचा मांडवी बीच हे योग्य ठिकाण आहे. येथे तुम्ही उंट सवारीचा आनंद घेऊ शकता. सूर्यास्ताचा सुंदर नजारा बघायला मिळतो. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे.
केरळच्या चेराई बीचला पर्यटकांची पहिली पसंती आहे. नववर्ष साजरे करण्यासाठी निसर्गप्रेमी येथे जाऊ शकतात. इथे समुद्राच्या लाटा तुम्हाला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. तुम्ही गोव्यापासून दूर एखादे वेगळे ठिकाण शोधत असाल तर हा बीच सर्वोत्तम असेल.