सौजन्य - सोशल मिडीया
कडक उन्हाळ्यानंतर आता मान्सूनचे आगमन झाले आहे. अशात पावसाच्या निसर्गरम्य वातावरणात भटकंती करायचे मन होते. जर तुम्ही फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर दिल्लीच्या अगदी जवळील अनेक ठिकाणे आहेत. त्या ठिकाणांना भेट देऊ शकता. तेथील अप्रतिम दृश्यांचा आनंद तुम्ही घेऊ शकता. मान्सूनमध्ये दिल्लीतील वातावरण अतिशय सुंदर असते. पाहूयात अशी ठिकाणं…
लॅन्सडाउन, उत्तराखंड
हे एक थंड हवेचे ठिकाण आहे. तुम्ही येथे उन्हाळ्यातही जाऊ शकता. गढवाल भागातील हे ठिकाण असुन पावसाळ्यात तेथील वातावरण नैसर्गिक सौंदर्याने नटलेले असते. सुंदर वातावरण आणि प्राचीन दृश्यांसह, लॅन्सडाउन हे भारतातील सर्वात शांत ठिकाण आहे. या ठिकाणी तुम्ही ट्रेकींगचा अनुभवही घेऊ शकता. एप्रिल ते जून यादरम्यान येथील हवामान अतिशय आल्हाददायक असते. दिल्लीपासुन लॅन्सडाउन 270.6 किमी अंतरावर आहे.
मनाली, हिमाचल प्रदेश
भारतातील हिमाचल प्रदेशातील कुल्लू मध्ये मनाली स्थित आहे. हे हिमाचल प्रदेशातील अतिशय प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. सर्वात लोकप्रिय असलेले हे थंड हवेचे ठिकाण अतिशय अप्रतिम दृश्य येथे तुम्हांला पाहायला मिळेल. बर्फाच्छादित पीर पंजाल आणि धौलाधर पर्वतरांगांचे सर्वात विहंगम दृश्य येथे पाहायला मिळते. हे ठिकाण प्रेमी जोडप्यांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. ही दृश्य पाहून तुम्हाला भुरळ पडेल. साहसप्रेमींसाठी हे ठिकाण स्वर्ग आहे. ट्रेकिंग, पॅराग्लायडिंग, स्कीइंग, रॉक क्लाइंबिंग, रिवर राफ्टिंग, जोरबिंग, स्नो स्कूटरिंग आणि रीवर क्रॉसिंग यासांरख्या ॲक्टिव्हीटीज येथे करायला मिळतील. बियास नदीच्या खोऱ्यात वसलेले हे शहर आहे. नवी दिल्लीपासून 537 किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरात पोहचण्यासाठी १० ते १२ तास लागतात. मार्च-जूनच्या कालावधीत या ठिकाणी पर्यटनासाठी आपल्याला जाता येईल.
नाहन, हिमाचल प्रदेश
सुंदर शिवालिक पर्वतांनी वेढलेले नाहान हे हिमाचल प्रदेशातील सर्वात आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. उंच पर्वतांच्या सुंदर पार्श्वभूमीवर वसलेल्या विस्तीर्ण बागा आणि अद्भुत मंदिरांमुळे नाहान शहर पर्यटकांना आनंदित करते. येथाल भव्य असा रेणुका तलाव पर्टकांसाठी खास आकर्षण आहे. याशिवाय तुम्ही रेणुका वन्यजीव उद्यान आणि अभयारण्य, राणी ताल, चुरधर शिखर आणि मां बाला सुंदरी मंदिराला भेट देऊ शकता. दिल्लीपासून २५० किमी अंतरावर हे शहर आहे. मार्च ते जुन-जुलै या कालावधीत या ठिकाणाला भेट देता येईल.
नौकुचियाताल
उत्तराखंडमध्ये स्थित नौकुचियातल हे दिल्लीजवळील एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. नऊ कोपऱ्यांचे तलाव म्हणून या शहराला ओळखले जाते. घनदाट जंगलांनी भरलेल्या या ठिकाणी नैनितालचे सर्वात खोल तलाव आहे. या ठिकाणी तुम्ही बोटींगचा आनंद घेऊ शकता.
मोरनी हिल्स, हरियाणा
हरियाणातील पंचकुलात वसलेले हे मोरनी हिल्स चंदीगड जवळ असलेले एक हिल स्टेशन आहे. हरियाणाचे एकमेव हिल स्टेशन असल्याने तेथे खूप गर्दी असते. मान्सुमध्ये हे शहर अगदी नयनरम्य वातावरण असते. वाइल्ड लाइफ फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.