(फोटो सौजन्य: Pinterest)
8 मार्च हा दिवस महिलांचा दिवस. जगभर हा दिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा काला जातो. महिलांचा आत्मविश्वास आणखी वाढावा यासाठी दरवर्षी महिलादिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तुम्हीही अजूनपर्यंत या दिवसासाठी काही प्लॅन केला नसेल तर सोलो ट्रीप तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. एकट्याने प्रवास करून तुम्ह तुमचा आत्मविश्वास वाढवू शकता.
जर तुम्हाला सुरक्षित आणि सुंदर हिल स्टेशनवर एकट्याने प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर आजची ही ठिकाणे तुमच्यासाठी परफेक्ट आहेत. या ठिकाणांचे सौंदर्य इतके अलाैकीक आहे की इथे तुम्हाला स्वर्गाचा अनुभव येईल. ही ठिकाणे फक्त नैसर्गिक सौंदर्यानेच परिपूर्ण नाही तर येथील स्थानिक समुदाय पर्यटकांसाठी अनुकूल आणि सुरक्षित मानला जातो. चला तर मग या यादित कोणकोणत्या ठिकाणांचा समावेश आहे ते जाणून घेऊया.
मनाली
मनाली हे भारतातील सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. हे एक सुंदर हिल स्टेशन आहे, जिथे बर्फाच्छादित पर्वत, मोहक दऱ्या आणि रोमांचक साहसी खेळ यांचा आनंद लुटु शकता. एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी हे ठिकाण अतिशय सुरक्षित मानले जाते. येथे जाऊन तुम्ही सोलांग व्हॅलीमधील साहसी खेळांचा आनंद घेऊ शकता. एवढेच काय तर इथे पॅराग्लायडिंग, स्कीइंग, स्नोबोर्डिंग असे साहसी खेळही आहेत, जे तुमचा दिवस संस्मरणीय करतील. यानंतर तुम्ही येथे, हिडिंबा देवी मंदिर आणि जोगिनी धबधब्याला भेट देऊ शकता. या सर्व अॅक्टीविटीजनंतर, तुम्ही जुन्या मनाली कॅफेमध्ये आराम करुन दिवसाची शीन घालवू शकता.
औली
तुम्हाला स्कीइंग करायला फार आवडत असेल तर, औली तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. येथील शांत दऱ्या आणि सुरक्षित वातावरण एकट्या प्रवासासाठी आदर्श आहे. येथे जाऊन औली येथील कृत्रिम तलाव पहा. स्कीइंग आणि केबल कार राइडचा आनंद लुटा. येथील नैसर्गिक सौदर्यं इतके अनोखे आणि दुर्लभ आहे की इथे एकदा जाताच तुम्हाला तेथून परत येण्याची इच्छाच होणार नाही.
दार्जिलिंग
दार्जिलिंगचे सैांदर्य जगभरात प्रसिद्ध आहे. हे हिल स्टेशन चहाची बाग, टॉय ट्रेन आणि कांचनजंगा पर्वताच्या दृश्यांसाठी लोकप्रिय आहे. येथील स्थानिक समुदाय अतिशय मैत्रीपूर्ण आहे, ज्यामुळे एकट्या महिला प्रवाशांना सुरक्षित वाटते. येथे जाऊन तुम्ही टायगर हिलवरून सूर्योदयाचा मनमोहक आनंद लुटु शकता. तसेच
तुम्ही इथे चहाच्या बागा आणि स्थानिक बाजारपेठांना देखील भेट द्या. या ठिकाणांच्या सुंदर वातावरणात तुम्ही तुमचा मोकळा वेळ आनंदात घालवू शकता आणि आपल्या ट्रीपचाही मुक्त आनंद लुटू शकता. ही सोलो ट्रीप नक्कीच तुमच्या फायद्याची ठरेल आणि तुम्ही कधीही न अनुभवलेले नवीन अनुभव तुम्हाला घडवून देईल.