उद्योगमंत्री, व मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या विधानसभा निवडणुकीच्या ऐतिहासिक विजयानिमित्त रत्नागिरीच्या इतिहासात प्रथमच देशभरातील नामांकित कुस्तीगिरांची कुस्त्यांची महादंगल रंगणार आहे. 10 आणि 11 जानेवारी या दोन दिवसांत देशातील नावाजलेल्या ५० कुस्तीपटूंच्या कुस्त्यांचा रंगलेला फड रत्नागिरीकरांना पहायला मिळणार आहे.रत्नागिरी जिल्हा मल्टिपल स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने रत्नागिरीत अनोख्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरीतील किंबहुना कोकणातील ही पहिलीच कुस्त्यांची स्पर्धा ठरणार असून हि स्पर्धा रत्नागिरीतील उद्यमनगर येथील मैदानात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत पहिला सामना महाराष्ट्र व भारत केसरी सिकंदर शेख विरुद्ध भारत केसरी दिल्लीचा कुस्तीपटू पैलवान भोला सिंग यांच्यात रंगणार आहे. दुसरी लढत महाराष्ट्र केसरी माऊली जगदाडे विरुद्ध पैलवान पंजाब केसरी जगदीप सिंह या दोघांमध्ये रंगणार आहे. तर तिसरी लढत ही पुण्याचा महाराष्ट्र केसरी पैलवान बाळा रफीक शेख विरुद्ध दिल्लीचा पैलवान भारत केसरी बंटी कुमार यांच्यात होणार आहे.