अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा एकदा विखे–लंके संघर्ष पेटला आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विद्यमान खासदार निलेश लंके यांच्यावर थेट प्रहार करत त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “मागच्या एका वर्षात मी जेवढं काम केलं, त्याच्या दोन टक्के सुद्धा आजच्या खासदाराने केलं नाही,” असा दावा करत त्यांनी निलेश लंकेंना थेट चॅलेंज दिलं.अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात कार्डियाक कॅथलॅब युनिटच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना विखे यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनासंदर्भात भाष्य करत, “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना नगर शहरातच होईल,” असं स्पष्ट केलं.त्याचबरोबर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतही त्यांनी इच्छुक उमेदवारांना आपल्या भाषणातून अप्रत्यक्ष टोले लगावत जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापवलं आहे.