अहमदाबाद येथील दुर्दैवी विमान अपघातात उरण तालुक्यातील न्हावा गावची रहिवासी… आणि हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी आकाशात झेपावलेली ही मुलगी मृत्यूच्या… कवेत गेल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील कर्ती मुलगी आणि आधारवड हरवल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जातीये. आज तिचं पार्थिव तिच्या मूळ गावी आणताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. शेवटचा निरोप देण्यासाठी जनसमुदाय लोटला होता. मैत्रीला शेवटचा निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले.