अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात चारचाकी वाहनाला साईड देण्याच्या किरकोळ वादातून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. हा वाद एका माजी नगरसेविकेच्या मुलीचा स्थानिकांसोबत झाल्यानंतर सुरू झाला. त्यानंतर काही तरुणांनी तलवार, कोयते घेऊन घटनास्थळी येत थेट हल्ला चढवला.स्थानिकांनी प्रतिकार करत हल्लेखोरांना पिटाळून लावले, मात्र यावेळी माजी नगरसेविकेच्या घरावरही दगडफेक करण्यात आल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात दोन ते तीन जण जखमी झाले आहेत.घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी कुणाल बाबरे, प्रशांत भोईर, ओम आणि इतर ४ ते ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली.