अंबरनाथ शहरात पश्चिमेला सर्कस ग्राऊंडवर नगरपालिकेच्या माध्यमातून भव्य नाट्यगृह उभारण्यात येत आहे. बहुप्रतिक्षित नाट्यगृहाच्या समोर असलेल्या भिंतीवर सध्या रंगरंगोटी करून आकर्षक चित्र रेखाटण्यात येत आहेत. कलाकार मोहन जगताप यांच्या संकल्पनेतील बोलकी चित्र अंबरनाथकरांना न्याहाळत येत आहेत. कल्याण- बदलापूर राज्य महामार्गावरून निर्मानाधीन असलेल्या नाट्यगृहाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या भिंतीवर महाराष्ट्राची नाट्य आणि सांस्कृतिक परंपरा नवीन पिढीला दाखविण्याचा प्रयत्न चित्रांच्या माध्यमातून करण्यात येतो आहे. आपली पारंपरिक संस्कृती दाखवणारी ही बोलकी चित्र पाहण्यासाठी वाटसरू देखील कुतूहलाने चित्र पाहून कलाकारांना दाद देत आहेत.