पंढरपूरच्या लाडक्या विठूरायाचं दर्शन सर्व वारकऱ्यांना व्हावं यासाठी दरवर्षी लातुरातील श्री सत्संग प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांना मोफत एसटी सेवा उपलब्ध करून दिली जाते. सोबतच वारकऱ्यांना फराळ, पाणी आणि जेवणाची देखील सोय प्रतिष्ठानच्या वतीने केली जाते. गेल्या 25 वर्षांपासून वारकऱ्यांची ही सेवा सत्संग प्रतिष्ठानच्या वतीने केली जात असून आज 31 एसटी बसेस मधून 1500 वारकरी पंढरपूर कडे रवाना झालेत. याप्रसंगी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी वारकऱ्यांच्या बस ला झेंडा दाखवून वारकऱ्यांचा पहिला जथा रवाना केलाय. यावेळी सत्संग प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक आमदार अमित देशमुख यांनी केलंय. तसेच प्रतिष्ठान व वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.