मुस्लिम बांधवांची पवित्र ईदुल अजहा आज 7 जून रोजी संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.बुलडाणा येथील जुना गावातील ईदगाहवर मुस्लिम बांधवांनी सकाळी 9 वाजता ईदची नमाज पठण केली.सकाळी 8 वाजता ईकबाल चौक येथून मुस्लिम बांधव ईदची नमाज पठण करण्यासाठी जुना गाव येथील ईदगाहकडे रवाना झाले व जामा मस्जिदचे इमाम हाफिज रहमत खां यांच्या नेतृत्वात ईदची नमाज पठण करण्यात आली.