पोलीस मित्र संघटनेने कर्जत तालुक्यातील सरकारी कार्यालय येथील विविध प्रश्न यांच्यावर उपोषण सुरू केले आहे.महसूल,पाटबंधारे, पंचायत समिती आणि वृध्द कलावंत आदी विषयांबाबत उपोषण केल्यावर तालुक्याचे तहसीलदार तसेच पाटबंधारे खात्याचे उप अभियंता आणि कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी उपोषण स्थळी येवून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रयत्न निष्फळ ठरला असून पोलीस मित्र संघटनेचे उपोषण सुरूच आहे. कर्जत शहरातील लोकमान्य टिळक चौक येथे पोलीस मित्र संघटनेचे उपोषण सुरू आहे.साखळी उपोषणाचा तिसरा दिवस असून सोमवार पर्यंत मार्ग निघाला नाही तर बेमुदत उपोषण सुरू केले जाणार आहे असा इशारा उपोषणकर्ते पोलीस मित्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रमेश कदम यांनी दिला आहे.सोमवार पासून बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर आठ दिवसात सर्व विषयांवर सरकार कडून सकारात्मक उत्तर मिळाले नाही तर हे सर्व आंदोलन कर्ते आत्मत्याग आंदोलन करणार आहेत.उपोषण कर्त्यांनी सुरू केलेल्या उपोषणाबाबत तालुक्याचे तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांनी उपोषणकर्ते यांची भेट घेतली.त्यावेळी तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील आणि पाटबंधारे विभागाचे उप अभियंता अमित पारधे,महसूल मंडळ अधिकारी संतोष जांभळे हे देखील उपस्थित होते.