गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे. वारंवार मागणी करून देखील कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील खड्डे बुजवले गेले नाहीत. या खड्ड्यातून गणरायाचे आगमन झाले आहे. मनसेकडून कल्याणमध्ये आज अनोखे आंदोलन करण्यात आले. गणेशाची वेशभूषा धारण करून गणेश खड्डे रस्त्यावर अवतरले. त्यांनी खड्ड्यातच ठाण मांडले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मालवणी भाषेत देवा महाराजा हे देखील गाऱ्हाणे घातले आहे. मनसेचे जिल्हाप्रमुख उल्हास भोईर यांच्या नेतृत्वात हे अनोखे आंदोलन करण्यात आले आहे