बांगलादेशी रोहिंग्यांच्या संदर्भात चर्चा केली, यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म दाखले देण्यात आलेत. वर्षभरात राज्यात जवळपास दोन लाख १४ हजार अर्ज आले होते. त्यापैकी एक लाख २३ हजार जणांना प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. १९ हजार प्रमाणपत्र तयार असून, ते दिले गेलेले नाहीत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकही नवीन प्रमाणपत्र देऊ नये, असे आदेश दिल्याची माहिती यावेळी किरीट सोमय्या यांनी दिली. लातूर जिल्ह्यात ९९७१ अर्ज आले आहेत. त्यापैकी ३ हजार ४२१ अर्ज लातूर शहरातील आहेत. या अर्जांपैकी ९९ टक्के अर्ज हे बांगलादेशी रोहिंग्यांचे आहेत, असा दावा सोमय्या यांनी यावेळी बोलताना केला.