राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला एकीकडं कोल्हापूर जिल्ह्यात विरोध होत असताना दुसरीकडं आता त्याच्या समर्थनार्थ देखील अनेक शेतकरी समोर येत आहेत.कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघातून हा शक्तीपीठ महामार्ग जावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आमदार शिवाजी पाटील यांनी केलीये.त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ आज आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लज शहरात भव्य पदयात्रा काढण्यात आलीये. या पदयात्रेत कार्यकर्त्यांसह अनेक शेतकरी सातबारे घेवून सहभागी झाले होते. या पदयात्रेत विविध आशयाचे पोस्टर घेवून कार्यकर्त्यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.शक्तीपीठ महामार्ग चंदगड तालुक्यातून गेल्यास काजू उद्योग, पर्यटन आणि दळणवळणापासून वंचित राहिलेल्या या भागाला विकासाची चालना मिळणार असल्याचं आमदार पाटील यांनी म्हटलंय..दरम्यान सतेज पाटील हे काँग्रेसचे आमदार असल्याने ते विरोध करणार.मात्र त्यांनाही विकास हवा आहे.त्यामुळे त्यांचे काही जास्त मनावर घेऊ नका.ते सुद्धा महामार्ग झाल्यावर सरकारचे अभिनंदन करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलायं.शिवाय माजी खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी आमदार राजेश पाटील यांच्यावर देखील शिवाजी पाटील यांनी जोरदार सडकून टीका केली आहे.