महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष आणि जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या उपस्थितीत लातूरच्या व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची सुसंवाद बैठक आज लातुरात पार पडली. या बैठकीत लातुरातील उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या अडचणी आणि प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. लातुरातील व्यापारी आणि उद्योजकांचे प्रश्न आणि अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चर पुढाकार घेणार असून, या प्रश्न येत्या मार्च महिन्यात मुंबईत संबंधित मंत्री आणि लातूरचे व्यापारी आणि उद्योजकांची बैठक घेण्यासाठी आपण पुढाकार घेणार, अशी माहिती ललित गांधी यांनी दिली. लातूर, सोलापूर, अमरावती यासह राज्यातील बारा जिल्हे राज्याच्या राजधानीशी विमानसेवेने जोडली जावीत, अशी चेंबरची भूमिका असून, यासाठीही संबंधित विभागाचे केंद्रीय मंत्री यांच्याशी चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. लातूरहून यावर्षी विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी आम्ही पुढाकार घेतला असल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली.