बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजद उमेदवार आणि प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता खेसारीलाल यादव यांच्या मीरा रोड येथील घरावर मिरा-भाईंदर महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाची नोटीस बजावल्याने नव्या राजकीय वादळाला सुरुवात झाली आहे.काँग्रेस नेते मुजफ्फर हुसेन यांनी या कारवाईमागे भाजपकडून राजकीय दबाव असल्याचा आरोप करत म्हटले की, “खेसारीलाल यादव यांना निवडणुकीत दबावाखाली ठेवण्यासाठी भाजपने ही नोटीस काढण्यास भाग पाडले.”दरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावत सांगितले की, “अनधिकृत बांधकाम कोणाचेही असो, कारवाई होणारच. या प्रकरणाचा बिहार निवडणुकीशी काहीही संबंध नाही.”