मीरा-भाईंदर शहरात वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर एक सकारात्मक चित्र समोर आले आहे. वाहतूक व्यवस्थापन करत असताना एका पोलिसाने मदत केल्याबद्दल एका नागरिकाने सार्वजनिक ठिकाणीच त्यांना मिठाई भरवून कृतज्ञता व्यक्त केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांकडून त्याचे स्वागत केले जात आहे. या प्रसंगामुळे पोलिस आणि नागरिक यांच्यातील विश्वास व सहकार्याचे नाते अधिक दृढ होण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.