आमदार रोहित पवारांनी सरकारच्या विसरभोळ्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आश्वासनं देऊन ती पाळण्यात अपयशी ठरलेल्या सरकारला उद्देशून त्यांनी ‘गजनी’ चित्रपटाच्या पोस्टरचा आधार घेत विधानभवनात प्रवेश केला. ‘गजनी सरकार, विसरभोळा कारभार’ असे लिहिलेलं पोस्टर दाखवत रोहित पवारांनी सरकारवर टीका करत म्हटले की, “दरवेळी आश्वासनं दिली जातात, पण त्यांची अंमलबजावणी होत नाही.” या अनोख्या आंदोलनामुळे विधिमंडळ परिसरात एकच चर्चेचा विषय बनला.