तीर्थरूप डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंती निमित्त देशभरात स्वच्छता अभियान पद्मश्री डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी तसेच रायगडभूषण डॉ श्री सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.स्वच्छता हा समाजसेवेचा महत्त्वाचा भाग मानून गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. विशेषतः ‘गाव स्वच्छता अभियान’ हा उपक्रम गेल्या सात वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर राबवला जात आहे. कर्जत तालुक्यात एकूण ३४ बैठकींमधून हजारो श्रीसदस्य या अभियानात सहभागी झाले आहेत.कर्जत तालुक्यातील नेरळ,माथेरान,कर्जत आणि कशेळे या चार ठिकाणी संपूर्ण शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.श्री बैठक कशेळे येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले यावेळे श्री बैठक गुढवण, श्री बैठक पाथरज, श्री बैठक वारे, श्री बैठक चाफेवाडी, श्री बैठक कोळीवली या सर्व बैठकी मधून या स्वच्छता अभियानासाठी श्री सदस्य लाभले होते.
या स्वच्छता मोहिमेत कशेळे येथील ग्रामीण रुग्णालय कशेळे, जिल्हा परिषद शाळा, स्मशानभूमी, हनुमान मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर, कशेळे मार्केट आणि आजूबाजूचा परिसर श्री दास एकत्र येत या स्वच्छता अभियानातून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय कशेळे येथील कर्मचारी वर्गाकडून या स्वच्छता अभियान उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
सदस्य महेश वैखरे
आदरणीय तीर्थरूप डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांचा एक मार्च जन्मदिवस असल्याने स्वच्छता अभियान राबवला जात आहे. आणि त्यांचा वाढदिवस संपूर्ण भारतभर स्वच्छता अभियान राबवून साजरा केला जात आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान द्वारे रक्तदान शिबिर, वृक्षरोपण लागवड व संवर्धन करणे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करणे, ऐकण्यासाठी श्रवण यंत्राच्या ही वाटप केले जातात, अपंग व्यक्तींना व्हीलचेअर देण्याचे काम या प्रतिष्ठान द्वारे केले जातात, रस्ता सुरक्षा ते साठी महाराष्ट्र पोलिसांकडे बॅरिगेटचेही वाटप करण्यात आले आहे.
प्रथम गाव स्वच्छता नंतर तालुका नंतर जिल्हा आणि महाराष्ट्र आणि संपूर्ण देश अशा संपूर्ण देशामध्ये स्वच्छता अभियान राबवले जात आहे. सुरुवात आपल्या स्वतःपासून आपल्या घरापासून केली तर पूर्ण देशापर्यंत स्वच्छता अभियान राबवले जात आहे. आपल्या अंतरीचा कचरा साफ करा बाहेरचा कचरा आपोआप साफ होईल अशी शिकवण बैठकांमध्ये दिली जात आहे.






