(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनेता आणि कवी संकर्षण कऱ्हाडे आपल्या अभिनयासोबतच साहित्यिक विचारांसाठीही ओळखला जातो. नुकतीच त्याने दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि ही भेट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
संकर्षणने आपल्या इन्स्टाग्रामवर गडकरींसोबतचा फोटो शेअर करत या भेटीचा अनुभव शेअर केला आहे. या भेटीदरम्यान दोघांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक विषयांवर गप्पा झाल्या. नितीन गडकरींनी संकर्षणला खास भेटवस्तूही दिली आहे. संकर्षणने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या भेटीत गडकरींनी त्याला स्वतः लिहिलेलं पुस्तक स्वाक्षरीसह भेटवस्तू म्हणून दिलं. संकर्षणच्या म्हणण्यानुसार, त्यांना मिळालेल्या अर्ध्या तासाच्या वेळेत गप्पा अगदी घर, घरातली माणसं, लिखाण, नागपूर, दिल्ली आणि खाणं यापर्यंत पोहोचल्या.
संकर्षण कऱ्हाडे पोस्टमध्ये म्हणाला,, “आज दिल्ली मध्ये नितीन गडकरी साहेबांची भेट झाली… त्यांनी स्वतः लिहिलेलं पुस्तक, स्वाक्षरी करुन भेट म्हणून दिलं. त्यांच्या भेटीसाठी मिळालेल्या अर्ध्या तासाच्या वेळेत गप्पांचे विषय हे घर, घरातली माणसं, लिखाण, नागपूर, दिल्ली आणि “खाणं…” असे चौफेर होते. वाह! मज्जाच आली… थँक्यू सर! ही खास भेट घडवून आणल्याबद्दल आमचे मित्र अंकित यांचे आभार!”
कृती सेननने इतिहास घडवला, वर्ल्ड हेल्थ समिटमध्ये बोलणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली!
नितीन गडकरी यांनी संकर्षणला India Aspires हे त्यांचं पुस्तक भेट म्हणून दिलं.विशेष म्हणजे, या पुस्तकाच्या पहिल्या पानावर नितीन गडकरी यांची स्वतःची स्वाक्षरी असून, संकर्षणने त्या पानाचा फोटो सुद्धा आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
‘India Aspires’ हे पुस्तक नितीन गडकरी यांचं दृष्टिकोन, नेतृत्वशैली आणि भारताच्या विकासावरील विचारांचं संकलन आहे. त्यांनी आपल्या वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यातील अनुभवातून भारताच्या प्रगतीसाठी काय काय शक्यता आहेत, यावर भाष्य केलं आहे.