ट्रिपल स्क्रीन असणाऱ्या 'या' 4 SUV मार्केटमध्ये एंट्री मारणार?
भारतीय ऑटो बाजारात अनेक अशा उत्तम कार पाहायला मिळत आहे, ज्यात सध्याच्या युगाला साजेसे असे मॉडर्न फीचर्स असतात. ग्राहकी देखील या कारला भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहे. हल्लीच्या नवीन आणि लेटेस्ट कारमध्ये एक फिचर आवर्जून पाहायला मिळत आहे. तो म्हणजे ट्रिपल स्क्रीन सेटअप.
कारमध्ये ट्रिपल-स्क्रीन सेटअप अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत, कारण ते कारला उच्च-तंत्रज्ञान आणि भविष्यवादी स्वरूप देतात. पूर्वी, हे फिचर फक्त मर्सिडीज किंवा ऑडीच्या टॉप-ऑफ-द-लाइन मॉडेल्ससारख्या लक्झरी इलेक्ट्रिक कारमध्ये उपलब्ध होते. हे फिचर विविध थीम, लेआउट आणि विजेट्स ऑफर करते, जे प्रवाशांसाठी डिजिटल अनुभव वाढवते.
आता Hyundai कंपनी ‘ही’ भारतीय व्यक्ती सांभाळणार! मिळाली CEO आणि MD पदाची जबाबदारी
Mahindra XEV 9e ही भारतातील पहिली कार आहे, जी तिच्या बेस मॉडेलपासूनच ट्रिपल स्क्रीन देते. यात तीन 12.3-इंच डिस्प्ले आहेत: एक इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी, एक ड्रायव्हर डिस्प्ले आणि एक पॅसेंजर डिस्प्ले. ट्रिपल स्क्रीनची वाढती मागणी पाहता Renault, Tata,आणि Mahindra सारख्या कंपन्या देखील त्यांच्या आगामी वाहनांमध्ये हे फिचर समाविष्ट करण्याची तयारी करत आहेत.
नव्या Tata Sierra मध्ये कंपनीकडून पहिल्यांदाच ट्रिपल स्क्रीन सेटअप दिला जाणार आहे. अलीकडेच या SUV चं टेस्ट मॉडेल दिसलं असून, त्यात डॅशबोर्डवर तीन जोडलेल्या स्क्रीन बसवलेल्या होत्या. यामध्ये मध्यभागी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्रायव्हरसाठी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, आणि को-पॅसेंजरसाठी स्वतंत्र डिस्प्ले स्क्रीन दिली जाईल. नवीन Tata Sierra मध्ये अनेक ॲडव्हान्स फीचर्स असतील आणि ही SUV पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक या तीनही इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध होईल.
नवीन Hyundai Venue दिसली रे! नव्या डिझाइनसह मिळेल लेव्हल 2 ADAS फिचर, ‘या’ महिन्यात होणार लाँच
Mahindra देखील आपल्या XEV 7e इलेक्ट्रिक SUV आणि XUV700 च्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये ट्रिपल स्क्रीन सेटअप देऊ शकते. XEV 7e ही प्रत्यक्षात XEV 9e ची तीन-रो (7-सीटर) आवृत्ती असेल. दोन्ही SUV मध्ये डिझाइन, फीचर्स, इंजिन आणि प्लॅटफॉर्म बऱ्याच अंशी सारखे असतील. त्यामुळे यातदेखील तीन स्क्रीन असलेला लेआउट मिळण्याची दाट शक्यता आहे.
तसेच, 2026 Mahindra XUV700 Facelift च्या स्पाय इमेजेसमधूनही स्पष्ट झाले आहे की त्यातही ट्रिपल स्क्रीन सेटअप दिला जाईल, जो बहुधा XEV 9e कडून घेतला जाईल.
Renault Duster ची नवी जनरेशन तिच्या जुन्या मॉडेलपेक्षा पूर्णतः वेगळी आणि आकर्षक असेल. यातील इंटिरिअर अधिक प्रीमियम आणि आधुनिक डिझाइनमध्ये तयार करण्यात आलं आहे. यातही ट्रिपल-क्लस्टर सेटअप दिला जाणार असून हा फीचर बहुधा फक्त टॉप व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असेल. नवीन Duster मध्ये Renault ची नवीन डिझाइन लँग्वेज वापरली जाईल आणि ती पेट्रोल, हायब्रिड आणि पूर्णपणे इलेक्ट्रिक अशा तिन्ही इंजिन पर्यायांमध्ये सादर केली जाईल.