(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेमधून घराघरांत पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते पंकज धीर यांचे १५ ऑक्टोबर २०२५ रोजी निधन झाले. कॅन्सरसारख्या आजाराशी लढा देत त्यांनी अखेरचा श्वास घेतला, आणि सिनेसृष्टीतील एक तेजस्वी तारा कायमचा निखळला.पंकज धीर यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्यावर पवन हंस येथे अंत्यसंस्कार करण्यात आले, जिथे ते पंचतत्वात विलीन झाले. त्यांच्या अंतिम यात्रेसाठी अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली.
बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेतील कर्ण या अजरामर भूमिकेने घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांच्या अंतिम यात्रेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत.‘इंस्टंट बॉलिवूड’ या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेल्या फोटोंमध्ये, पंकज धीर यांचा मुलगा निकितिन धीर वडिलांच्या अर्थीला खांदा देताना दिसतो. या भावनिक प्रसंगी अभिनेता कुशाल टंडनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तो देखील निकितिनसोबत पंकज धीर यांच्या मृतदेहाला खांदा देताना दिसला.
ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या अंतिम यात्रेला अनेक सेलिब्रिटींनी उपस्थित राहून शेवटचा निरोप दिला.त्यांच्या अंतिम यात्रेला अनेक सेलिब्रिटींनी उपस्थित राहून शेवटचा निरोप दिला. त्यांच्या अंतिम यात्रेत सलमान खान देखील उपस्थित होता.
‘महाभारत’ फेम अभिनेत्याच्या निधनाची बातमी त्यांचे सह-अभिनेता फिरोज खान यांनी जाहीर केली. चाहत्यांना अश्रू अनावर झाले आहे. पंकज धीर हे CINTAA, सिने आणि टीव्ही कलाकार संघटनेचे माजी सरचिटणीस होते. CINTAA ने देखील त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच आता त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.