शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर आज नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसेतर्फे जल्लोष करण्यात आला आहे. फटाके फोडत, पेढे वाटत, ढोल ताशांच्या गजरात फुगड्या खेळत हा जल्लोष साजरा करण्यात आला. हा मराठी माणसांच्या एकजुटीचा विजय असून दिल्लीचेही तख्त झुकवितो महाराष्ट्र माझा अशी प्रतिक्रिया मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केली आहे.