नुकत्याच जाहीर झालेल्या 2025 च्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या निषेधार्थ बुधवारी (दि.5) किसान सभेच्या वतीने अर्थसंकल्पाच्या प्रती जाळून सरकारविरुद्ध निदर्शने करण्यात आली. अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष कॉम्रेड राजन क्षीरसागर व माधुरी क्षीरसागर यांच्या उपस्थितीत हि निदर्शने करण्यात आली. नरेंद्र मोदी सरकारने 2025 च्या अर्थसंकल्पाद्वारे पुन्हा एकदा आपली कॉर्पोरेट-पक्षपाती आणि शेतकरीविरोधी भूमिका स्पष्ट केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकर्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे, ज्यात कृषी उत्पादनासाठी किमान आधारभूत किंमतची कायदेशीर हमी आणि शेतकरी कर्जमाफीचा समावेश आहे.