सध्या राज्यात लहान मुली या लैंगिक शोषणाला बळी पडत असल्याच्या दुर्देवी घटना घडत आहेत. बदलापूर अत्याचाराचं प्रकरण ताजं असतानाच आता कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याचपार्श्वभूमीवर मंत्री रामदास आठवले यांनी पिडित कुटुंबियांची भेट घेतली आहे. दरम्यान याबाबत रामदास आठवले य़ांनी माध्यमांना मुलाखत दिली आहे. आठवले म्हणाले की, आरोपी विशाल गवळीसह त्याची पत्नी देखील या गुन्ह्यात दोषी आहे. त्यामुळे या दोषींवर योग्य ती कारवाई करुन त्यांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु असं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.