कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा हट्ट धरला आहे तो महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय हानिकारक आणि घातक आहे. कारण अलमट्टी धरणाची आणखी पाच मीटरने उंची वाढवण्यास लवादाने मान्यता दिल्याने आता हा विषय राज्य सरकारच्या ताब्यामध्ये राहिलेला नसल्याने आता जनतेमधूनच याच्या विरोधात रेटा वाढवायला हवा. त्याचबरोबर सांगली कोल्हापूर सातारा हे तिन्ही जिल्हे बंद चा निर्णय आमदार अरुण लाड यांनी आज सांगलीमध्ये आयोजित मेळाव्यात घेतला आहे. दरम्यान अरुण लाड हे जो काही निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा राहील अशी प्रतिक्रिया ही खासदार विशाल पाटील आणि तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.