मिरज तालुक्यातील बेडग मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने स्वागत कमान उभी करताना ती ग्रामपंचायत प्रशासनाकडून वाढल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. आणि ही कमान वादग्रस्त ठरली होती. सदर कमान आहे त्या ठिकाणी उभी करावी यासाठी बेडग मधील सर्व आंबेडकरी समाजाने मंत्रालयावर लॉंग मार्च काढला होता. त्यामुळे हे प्रकरण संपूर्ण राज्यभरामध्ये गाजले होते. त्यानंतर सदर कमानीस मंजुरी देण्यात आली होती. या नव्याने तयार झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमानी चा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधाना वर आधारित देश आपल्याला निर्माण करायचा आहे. सर्व जाती – जमाती, सर्व धर्मातील लोकांना एकत्र करून देशाच्या विकास करायचा आहे, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे.