शाळांमधील शिपाई पद कंत्राटी करण्याचा निर्णय रद्द करावा सदर पदे वेतनश्रेणीतच भरावीत अन्यथा राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिलाय राज्यातील शाळांमध्ये शिपाई पद कंत्राटी करण्याचा निर्णय अन्याकारक असून शासनाने हा निर्णय त्वरित रद्द करावा आणि मराठी शाळा वाचवाव्यात अशी राज्यातील खासगी शिक्षण संस्था चालकांची एकमुखी मागणी आहे. महामंडळाच्या मुंबई अधिवेशनात या आशयाचा ठराव पारित करुन राज्याचे शिक्षण मंत्री ना. दादा भुसे यांना निवेदन दिले असल्याची माहिती रावसाहेब पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.