मुंबई विलेपार्ले येथे बीएमसी ने जे जैन मंदिर पाडले त्याच्या निषेधार्थ आणि समाजाचा रोष व्यक्त करण्यासाठी समस्त भारतामध्ये आज जैन बांधवांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे. भारतातील जैन तीर्थक्षेत्रामध्ये होणारे अतिक्रमण थांबवावे, जैन साधू साध्वी यांच्यावर वारंवार होणारे हल्ले थांबवावेत, रस्त्यावरून चालताना जैन साधूंचे अपघात होत आहेत ते थांबावेत, जैन साधूंना जिल्हा परिषद च्या शाळा उपलब्ध करून द्याव्यात यासह विविध मागण्यांसाठी देशभर हा मोर्चा काढण्यात आला असून याच पार्श्वभूमीवर सोलापुरात सकल जैन समाजाच्या वतीने शांततेत मोर्चा काढण्यात आलेला आहे.