ठाण्यात कार्यरत आणि बाहेरून नोकरी–व्यवसायानिमित्त वास्तव्यास येणाऱ्या महिलांसाठी आता सुरक्षित आणि आधुनिक निवासाची सोय उपलब्ध होणार आहे. भाईंदरपाडा येथे ठाणे महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या ५० कोटी रुपयांच्या महिला वसतिगृहाचे भूमिपूजन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमाला ठाणे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मंत्री सरनाईक म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. त्याच धर्तीवर कार्यरत महिलांना सुरक्षित, सन्माननीय आणि परवडणारे निवासस्थान मिळावे यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे.”