Union Minister Nitin Gadkari Reached Parliament In A Hydrogen Car
NITIN GADKARI | केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हायड्रोजन कारने पोचले संसदेत
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज हायड्रोजन आधारित फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल (FCEV) ने संसद भवनाला भेट दिली. ‘ग्रीन हायड्रोजन’ ने चालवलेल्या कारचे प्रात्यक्षिक करून, गडकरी जी यांनी हायड्रोजन, FCEV तंत्रज्ञान आणि भारतासाठी हायड्रोजन-आधारित समाजाला समर्थन देण्यासाठी त्याच्या फायद्यांबद्दल जागरूकता पसरवण्याच्या गरजेवर भर दिला. ग्रीन हायड्रोजन भारतात तयार केले जाईल, देशात शाश्वत रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी ग्रीन हायड्रोजन रिफ्युलिंग स्टेशन्सची स्थापना केली जाईल, असे आश्वासन श्री गडकरींनी दिले. भारत लवकरच हरित हायड्रोजन निर्यात करणारा देश होणार असल्याचे गडकरी म्हणाले