पालिकेच्या माहितीनुसार, उल्हासनदी काठच्या शहरांचा पाणीकपात होणार आहे. मोहिली जलशुद्धीकरणत केंद्रातील पाणी हे टिटवाळा, वालधुनी, कल्याण पश्चिमकल्याण पूर्वेतील वालधुनी परिसर, कल्याण पश्चिमेतील बिर्ला महाविद्यालय परिसर, उपप्रादेशिक परिवहन विभाग परिसर, टिटवाळा अ प्रभाग क्षेत्रातील मांडा, टिटवाळा मोहने, आंबिवली, धाकटे शहाड, शहाड, बंदरपाडा वडवली परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
दरम्यान, 12 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणीपुरवठा आपल्या घरात करून ठेवावा, असे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.






