बीड हत्याप्रकरणाने राज्यात तीव्र पडसाद उमटत आहे. याचपार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. संभाजीराजे म्हणाले की, संतोष देशमुख यांची जी क्रुर पणाने हत्या केली गेली ती खऱ्या अर्थाने माणुसकीची हत्या केलेली आहे. हा विषय जातीच्या पलीकडचा असल्यामुळे आम्ही सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांनी विनंती केली आहे. सामान्य माणसांचा जो काही आक्रोश चालू आहे ते महाराष्ट्राला परवडणारं नाही हे सांगण्यासाठी आहे, अशी विनंती राज्यपालांना केली असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं आहे. पुढे ते असं म्हणाले की, आरोपीला अटक होणं गरजेचं आहे. त्याचुप्रमाणे बीडमध्ये जे अधिकारी नेमलेले आहेत, हेच अधिकारी बीडमध्ये धनंजय मुंडे यांनी आणलेले आहेत. त्यामुळे एसआयटीला चांगले अधिकारी नेमले गेले जावेत अशी मागणी केली आहे.