सीमा आनंद यांचं नाव गुगलवर सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आलेलं आहे. तरुणाईमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असलेल्या या सीमा आनंद नेमक्या आहेत तरी कोण चला जाणून घेऊयात.
एका पॉडकास्टमध्ये 63 वर्षीय महिलेने सेक्स एज्युकेशनबाबत वक्तव्य केलं. त्य़ानंतर याबाबत अनेक शॉर्ट्स सोशल मीडियावर व्हायरल झाले. ही महिला म्हणजे सीमा आनंद. संभोग, सेक्स य़ा संवेदनशील विषयांचा टॅबू भारतात आजही आहे. याच विषयावरचा न्यूनगंड निघून जावा आणि तरुण वर्गाला योग्य ती माहिती देण्याचं काम त्या करतात. सेक्स एज्युकेशनवरच्या त्य़ांच्या भाषणाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली. त्यांचे हे व्हिडीओ इतके व्हायरल झाले की, चक्क 15 वर्षाच्या मुलाने त्यांना प्रपोजल दिलं होतं.
यह रहा वीडियो pic.twitter.com/vkO0U5DyHE — ममता राजगढ़ (@rajgarh_mamta1) January 6, 2026
एका पॉडकास्ट शो दरम्यान शुभंकर मिश्रा याने मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्याने सीमा आनंद यांना प्रश्न विचारला होता की, कमी वयाच्या मुलांना वयाने मोठ्या असलेल्या महिलांचं मोठ्या प्रमाणात आकर्षण असतं. याबद्दल तुम्ही काय सांगाल ? यावर उत्तर देताना म्हणाल्या की, जेव्हा त्या 63 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांना एका 15 वर्षांच्या मुलाने अर्वाच्च्य भाषेत वक्तव्य केलं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलेला हा किस्सा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. यातून युजर्सना एक गोष्ट कळली की, वयात येणाऱ्या मुलांबाबतचा विषय दिवसेंदिवस संवेदनशील होत जात आहे. त्यामुळे आपण आपल्या मुलांशी मोकळेपणाने बोलण्याची किती गरज आहे ते यातून लक्षात येतं, अशा कमेंट यायला सुरुवात झाली.
या सगळ्य़ा नंतर सीमा आनंद या कमी वेळात चांगल्या सेक्स एज्युकेटर म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. सेक्स एज्युकेशन देण्याबरोबर सीमा या लेखिका देखील आहेत. त्यांचा पौराणिक कथांबाबतचा अभ्यास देखील दांडगा आहे. आज ट्रेंडिंगच्या या जगात Google वर सर्वाधिक वेळा त्यांचं नाव सर्च करण्यात आलेलं आहे.






