(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर कधी काय दिसून येईल याचा नेम नाही. इथे नेहमीच अनेक थक्क करणारे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात कधी कधी असेही दृश्य दिसून येतात ज्यांचा आपण कधी स्वप्नातही विचार केला नसेल. काही व्हिडिओज चेहऱ्यावर हसू आणतात, काही भावुक करतात तर काही आश्चर्याचा धक्का देऊन जातात. आताही इथे एक सुंदर आणि नयनरम्य व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात व्यक्तीने एका असा चमत्कार करून दाखवला की पाहणारे पाहातच राहिले. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, यात दोन व्यक्ती रात्रीच्या वेळी रस्त्यावर शेकोटी पेटवून त्याची मजा लुटत असल्याचे दिसते. रस्त्याच्या कडेला शेकोटी करतानाच त्यांच्या मनात काही खुरापती करण्याचा विचार येतो आणि मग जे घडते त्याने सर्वांचेच डोळे विस्फारतात. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती शेकोटीतील एक आगीचा गोळा अलगद हवेत उडवतो आणि दुसरा व्यक्ती एका प्लेटने या गोळ्याला जोरात फटका मारतो. आता तुम्हाला वाटेल की ते असं का करता आहेत पण पुढच्याच क्षणी आपल्याला याचे उत्तर मिळते. आगीच्या गोळ्याला जोरात फटका मारताच त्याचे असंख्य चिंगारीत रूपांतर होते आणि हवेत चिंगरींचा पाऊस पडतो. रात्रीच्या वेळी हे दृश्य फारच सुंदर दिसते आणि सोशल मीडियावर सर्वांचेच मन वेधून घेते.
हा व्हायरल व्हिडिओ @techzexpress नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला, ‘ही कोणत्या प्रकारची आतिषबाजी आहे’ असे कॅप्शन देण्यात आले आहे’. आतापर्यंत व्हिडिओला लाखो व्युज मिळाले असून व्हिडिओतील सुंदर दृश्यांवर अनेकांनी आपले कमेंट्समध्ये आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “स्वस्त पण सुंदर” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ हे अद्भुत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्यांची ट्रिक चांगली काम करत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.