(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर अनेक मजेदार आणि मनोरंजक गोष्टी नेहमीच व्हायरल होत असतात. आतापर्यंत जगभरातील करोडो युजर्स सोशल मीडियावर जोडले गेले असून इथे नेहमीच काही ना काही व्हायरल होतं असतं. इथे बऱ्याचदा प्राण्यांच्या लढाईचे दृश्यही व्हायरल होतात जे पाहणे फार मनोरंजक ठरते. आताही एक गोड आणि हास्यास्पद लढाई सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ज्यात एक गरुड आणि मांजर भांडताना दिसून आले आहेत. दोन चिमुकले प्राणी भांडत आहेत पण हे दृश्य धोकादायक नाही तर मजेदार वाटत आहे. युजर्सने त्यांच्या या लढाईचे चांगलीच मजा घेतली असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
मांजर ही दिसायला क्युट असली तरी बऱ्याच लहान प्राण्यांची शिकार करून ती त्यांना फास्त करत असते आणि यातच यावेळी तिच्या हातात गरुड लागला आहे. बरं गरुड देखील काही साधासुधा प्राणी नसून अवकाशातील अनेक पक्ष्यांची तो शिकार करतो अशात या दोन शिकाऱ्यांमध्ये सुरु झालेली ही लढत एक रोमांचक वळण घेते पण ते ज्या प्रकारे भांडतात ते पाहून हे दृश्य जरा जास्तीच हास्यास्पद बनते. व्हिडिओमध्ये सुरुवातीला गरुड मांजरीला आपल्या चोचीने मारताना दिसून येतो पण पुढच्याच क्षणी मांजर गरुडाचा गळा पकडत त्याला जमिनीवर आपटते. दोघेही एकमेकांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना काही ते जमत नाही आणि कधी मांजर पुढे तर कधी गरुड असं करत ही लढाई पुढे सुरूच राहते. मांजर आणि कबुतराच्या या लढाईत कोण जिंकले आणि कोण हरले, हे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळेल. पण, हो, हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला मजा तर खूप येईल इतकं नक्की…
मांजर-गरुडाच्या या लढतीचा व्हिडिओ @rtalwar1962 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ते प्रेमाने लढत आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मांजरी प्रेमी म्हणून, मला या मांजरीच्या पिल्लाबद्दल वाईट वाटले” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पक्षी नेहमीच डोळ्यांवर हल्ला करत असल्याने मांजरीच्या पिल्लासाठी धोकादायक परिस्थिती आहे, व्हिडिओ शूट करण्याऐवजी मदत करायला हवी”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.