(फोटो सौजन्य – Instagram)
दररोज आपल्याला जंगलात काहीतरी नवीन आणि रोमांचक पाहायला मिळते. अलिकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सिंह आणि म्हशींमधील भयंकर लढाई दाखवण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये एक म्हैस आणि तिचे वासरू मोकळ्या शेतात फिरताना दिसत आहेत. मात्र तितक्यात काही सिंह तिथे येतात आणि वासरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या मुलावर हल्ला केल्याचे पाहताच म्हैस चवताळून उठते आणि सिंहाच्या संपूर्ण ग्रुपवर हल्ला चढवते. यानंतर पुढे जे घडते ते सर्वांनाच धक्का देऊन जाते, एका क्षणातच खेळाचे संपूर्ण चित्र पालटते. आता यात नक्की काय घडते ते जाणून घेऊया.
एका ड्रेसमुळे महिलांमध्ये झाली तुंबळ हाणामारी, दोघींनी एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारलं; Video Viral
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक सिंहाचा कळप म्हशीच्या पिल्लावर हल्ला करतो. यानंतर कोणत्याही भीतीशिवाय म्हैस पुढे येते आणि आपल्या पिल्लाचे रक्षण करते. ती एकट्याने सिंहांचा सामना करतो आणि कोणत्याही किंमतीत आपल्या पिल्लाला वाचवण्यास तयार असते. म्हशीचे धाडस पाहून सिंहही मागे हटत नाहीत हे व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. थोड्याच वेळात, सिंहांचा संपूर्ण गट येतो आणि म्हशीला सर्व बाजूंनी घेरतो. पण खरी जादू तर तेव्हा होते जेव्हा मागून म्हशींचा एक मोठा ग्रुप येतो आणि सिंहांवर प्रतिहल्ला करतो. म्हशींची ताकद पाहताच सर्व सिंह घाबरतात आणि उलटे पाय घेऊन तिथून निघून जातात.
व्हिडिओतील क्षणात बदलणारे हे दृश्य आपल्याला अनेक गोष्टी शिकवून आणि दाखवून जाते. व्हिडिओमध्ये दाखवलेला हा प्रसंग केवळ रोमांचक नाही तर तो आपल्याला हे देखील शिकवतो की जर तुम्ही कठीण परिस्थितीतही खंबीर राहिलात तर तुम्ही नक्कीच जिंकाल. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून लोक आता त्याला वेगाने शेअर करत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @dennis_koshal नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखोंनी व्युज मिळाल्या असून लोकांनी यावर आपल्या वेगवगेळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आईची शक्ती अतुलनीय आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्वा, धाडसी आई, आणि बाकीचे कळप मदतीला आले हे खूप छान आहे. अद्भुत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.