(फोटो सौजन्य: Instagram)
सध्याच्या जगात काळ जसजसा पुढे जात आहे, लोक तितकीच विकृत आणि वाईट होत चालली आहे. मानवाची विकृती दाखवून देणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाले आहेत आणि त्यातच आता आणखीन एक असाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे ज्यात मानवाने अक्षरशः हद्दच पार केल्याचे दिसून आले. आपल्याला मजा वाटावी म्हणून मुक्या प्राण्यांना आधिपासून वाईट वागणूक दिली जात आहे. आताच्या व्हिडिओतही तसेच काहीसे घडले मात्र यावेळी तर सर्वच मर्यादा ओलांडल्या गेल्या. व्हिडिओत एका श्वानाला जिवंत मातीत पुरण्यात आले. जिवंतपणे आपल्याला पुरले जात आहे ही भावनाच किती वेदनादायी आहे याचा विचार करा. व्हिडिओत काय दिसले ते जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक व्यक्ती, फावड्याने माती उकरून काढत आहे आणि पुढच्याच क्षणी आपल्याला श्वानाचे डोळे दिसू लागतात. व्यक्ती जसजसा माती उकरत जातो श्वानाचे गाढलेले शरीर हळूहळू दिसू लागते. मुख्य म्हणजे यावेळी हा श्वान जिवंत असतो. त्याच्या डोळे दुःखी असतात आणि त्याचे संपूर्ण शरीर थरथर कापत असते. त्याची अवस्था इतकी वाईट झालेली असते की त्याच्या मुखातून एक शब्दही फुटत नाही. ही घटना कुठली आहे आणि कोणी हे केले हे तर अद्याप समजले नाही मात्र याचा व्हिडिओ पाहून आता सोशल मीडियावर सर्व भयंकर संतापले आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिले असून युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “कर्म कुणाला चुकत नाहीहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “काय चुकी आहे रे त्याची प्लिज अस नका करूरे त्याला ही वेदना हेता त्याचंही जीव आहे रे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “असं करून कधीही चांगलं होत नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.