(फोटो सौजन्य: Twitter)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात कधी लोक स्टंट्स करताना दिसतात तर कधी काही जुगाड करताना. हे व्हायरल व्हिडिओज लोकांचे मनोरंजन करतात कधी त्यांना हसवतात कधी भावुक करतात तर कधी थक्क करून सोडतात. अजगर आणि कोब्रासारख्या विषारी सापांचे व्हिडिओ देखील इथे बऱ्याचदा शेअर होतात. सध्या देखील इथे एक असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक व्यक्ती किंग कोब्राला बाटलीत पकडताना दिसून आला.
किंग कोब्रा हा एक विषारी प्राणी आहे. त्याच्या विषाच्या जोरावर तो कुणालाही क्षणात मृत्यूच्या घेऱ्यात घेऊ शकतो. जंगलातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी तो एक आहे. अशात कोब्राच्या वाटेला अधिकतर कुणी जाऊ पाहू नाही. मात्र नुकताच व्हायरल होत असलेल्या या एक व्यक्ती कोब्रासोबत एक अनोखाच पराक्रम करताना दिसला. त्याचे हे धाडस पाहून अनेकजण थक्क झाले तसेच त्याचे कौतुकही करू लागले. यावेळी व्यक्ती एका कोब्राला पकडून पाण्याच्या बाटलीत टाकण्याचं प्रयत्न करताना दिसला. आता कोब्रा या बाटलीत आला की नाही आणि यात पुढे काय घडते ते जाणून घेऊया.
काय दिसले व्हिडिओत?
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, आत दिसते की, व्यक्ती प्रथम एक पाण्याची मोठी रिकामी बाटली हातात घेतो आणि त्यामध्ये कोब्राला टाकण्याचा प्रयत्न करतो. त्याने कोब्राचे डोके पकडण्याचा प्रयत्न करताच कोब्रा त्याच्यावर हल्ला करतो. यानंतर हा व्हिडिओ आणखीनच रोमांचक होतो, कारण सापाचा हल्ला इतका जोरदार होता की काही क्षणांसाठी ती व्यक्ती घाबरली. पण त्याने हिंमत न गमावता आपल्या हुशारीने सापाला बाटलीत टाकण्याची प्रक्रिया सुरू ठेवली. तब्बल 42 सेकंदांच्या धडपडीनंतर अखेर त्याने कोब्राला सुरक्षितपणे बाटलीत टाकले आणि बाटलीचे झाकण लगेच बंद केले. ही संपूर्ण प्रक्रिया बऱ्याचदा मनोरंजक वळण घेते ज्यामुळे ते पाहणे रोमांचक ठरते.
Interesting method for catching snakes pic.twitter.com/Fw816roCRU
— Crazy Clips (@crazyclipsonly) February 13, 2025
कोब्राचा हा व्हायरल व्हिडिओ @crazyclipsonly नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘साप पकडण्यासाठी मनोरंजक पद्धत’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 2 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मी शक्य तितक्या वेगाने तिथून धावणे पसंत करेन” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला समजले नाही, कोब्रा खरोखरच मूर्ख आहेत का”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.