(फोटो सौजन्य: Youtube)
सोशल मिडियावर लढतीचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. जीवनचक्राप्रमाणे प्रत्येक प्राणी, पक्षी हा शिकार करुनच आपलं पोट भरतो. या शिकारीसाठी ते बहुतेकवेळी लहान प्राण्यांना आपली शिकार बनवतात पण शिकारीच दुसऱ्या शिकाऱ्याच्या मागे लागला, त्याला भक्ष्य बनवू लागला तर काय होईल याचा विचार करा. अलिकडेट शिकारीचा अनोखा थरार इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. यात एक मगर आणि अजगर पाण्यात लढताना दिसून आले. दोघांंमधील या घमासन युद्धाने सर्वच हादरले पण दोघांनीही मानली नाही हार, शेवटी काय घडलं? चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या .या व्हिडिओमध्ये मगरीने अजगराला आपल्या जबड्यात घट्ट पकडल्याचे दिसून येत आहे. अजगर भक्षकांसाठी धोकादायक असले तरी, यावेळी तो मगरीच्या तावडीत अडकला आहे. अजगर स्वतःला सोडवण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करतो, कधीकधी मगरीभोवती त्याचे शरीर गुंडाळून प्रत्युत्तर देतो. हे दृश्य केवळ थक्क करणारे नाही तर अजगराची जगण्याची इच्छाशक्ती देखील दर्शवते. पण मगरीने शेवटपर्यंत अजगरावर पकडलेली पकड अजगराचा शेवट झाल्याचे दर्शवते. हा व्हिडिओ दोन्ही प्राण्यांची ताकद आणि आक्रमकता दाखवतो. निसर्गात रोज अशा अनेक घटना घडून येत असतात, फक्त काही आपल्या नजरेसमोर येतात तर काही नजरेआड होतात.
हा व्हिडिओ @Latest Sightings या यूट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला १.८ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या लढाईविषयी आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “सापाला आता “मृत्यूच्या विळख्यात अडकल्याची भावना कळते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो अजगर किती काळ टिकला याचे मला आश्चर्य वाटते” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “शिकारीचं शिकार झालाय”.हा व्हिडिओ रोमांचक वाटत असला तरी, तो आपल्याला आठवण करून देतो की जंगलातील प्रत्येक क्षण अनिश्चिततेने भरलेला असतो. इथे फक्त तोच टिकतो ज्याच्यात ताकद आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






