फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहून हसावे की रडावे कळत नाही. तर अनेकदा असे व्हिडिओ समोर येतात जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. डान्स, मारामारी, जुगाडचे व्हिडीओ व्हायरल होणे तर सामान्य गोष्ट आहे, पण या व्हिडीओमध्ये असे काही व्हिडीओ पाहायला मिळतात जे पाहिल्यानंतर माणूस थक्क होतो. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. एक तरूण विजेच्या खांबावर वर्कआऊट करताना दिसत आहे.
विजेच्या खांबावर पुलअप
तुम्ही खूप वेळा लोकांना वर्कआउट करताना पाहिलं असेल. तुम्ही काही लोकांना जिममध्ये वर्कआउट करताना तर काहींना पार्कमध्ये वर्कआउट करताना पाहिले असेल. काही लोक घरी बसून व्यायामही करतात. पण तुम्ही कधी विजेच्या खांबावर चढून विजेच्या तारांना लटकून कसरत करताना पाहिले आहे का? सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ असाच आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती विजेच्या तारांना लटकत पुलअप करत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण आवाक् झाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. पण या व्हिडिओचे दृश्याने अनेकांना हैराण कडून सोडले आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर piyush__reels अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले तर हजारोंनी व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले आहे की, एका यूजरने लिहिले की, भावाला ऑराची गरज नाही तर ऑराला भावाची गरज आहे. आणखी एका व्यक्तीने म्हटले आहे की, ‘तो त्याच्या मृत्यूशी खेळत आहे. हा सध्याचा माणूस आहे.’ दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, ‘हा भारतीय थोर आहे जो प्रत्येकाच्या घरात वीज पाठवतो. देसी दारूची ताकद.’