सुरत : सुरत (Surat) मधील एका विचित्र अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या अपघातात रस्त्यावरून चालणारा एक टॅम्पो थेट हॉटेलात घुसला आणि एका क्षणात त्या हॉटेलचं होत्याच नव्हतं झालं.
सूरत:
क्या इस तरह भी दुर्घटना होती है… pic.twitter.com/7daOHqLrcI— Raghvendra Pandey?? (@bhaiyaji25) December 19, 2022
8″></script>रस्त्याच्या कडेला असलेल्या एका लहान हॉटेलमध्ये ग्राहक चहा पीत बसले होते तर काही विश्रांती घेत होते. एवढयात कोणाला काही कळण्याच्या आत अचानक रस्त्यावरून धावणारा एक भरधाव टेम्पो थेट हॉटेलमध्ये शिरला. टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव टेम्पोने हॉटेलचे बरेच नुकसान केले. तर हॉटेल मधील काही ग्राहक देखील या भीषण अपघातात जखमी झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडीओ वायरल होत असून नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.