(फोटो सौजन्य: X)
घरात बांधला एस्कलेटर
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील अर्थमुरु गावातून समोर येत आहे. गावातच राहणाऱ्या ६५ वर्षांच्या मेकनिक पतीने आपल्या पत्नीसाठी काही खास करुन दाखवले. वृत्तानुसार, दोघेही पहिल्या मजल्यावर राहत होते जिथे जाण्यासाठी २१ पायऱ्या चढायला लागायच्या. वाढत्या वयामुळे पत्नीला सांधेदुखीचा त्रास होत होता. यामुळेच दररोज इतक्या पायऱ्या चढून जाणे तिला शक्य होत नव्हते. पत्नीचा हाच त्रास ओळखून पतीने तिची मदत करु पाहिली. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण मॅेकॅनिक पतीने अनोखी शक्कल लढवत पत्नीचा त्रास कमी करण्यासाठी घरातच लहान एस्कलेटर बनवून घेतला.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात महिला एका फळीसारख्या वस्तूवर उभे राहिल्याचे दिसते. ही फळी आपोआप पायऱ्यांवरुन खाली जाते ज्यामुळे यावर उभं राहताच काही क्षणातच महिला पायऱ्यांवर न चालताच खाली उतरते. मुख्य म्हणजे हा जुगाड कोणत्या कंपनीने नाही तर महिलेच्या पतीनेच तिच्यासाठी स्वत: तयार केलेला असतो. हा अनोखा शोध सोशल मिडियावर शेअर होताच यूजर्स भारीच खुश झाले. जिथे प्रेम आहे तिथे काहही करणं शक्य आहे अशा प्रतिक्रिया यूजर्सने व्हिडिओला दिल्या.
#viralvídeo తూర్పు గోదావరి జిల్లా అర్థమూరు గ్రామానికి చెందిన 65 ఏళ్ల మెకానిక్ సత్తి శివ నారాయణ రెడ్డి, తన 58 ఏళ్ల భార్య సత్యవేణి ఇంటి మొదటి అంతస్తుకు ఉన్న 21 మెట్లు ఎక్కడానికి ఇబ్బంది పడకుండా స్వయంగా ఇంట్లోనే ఎస్కలేటర్ను తయారు చేశారు. రెండేళ్ల క్రితం ప్లాన్ చేసిన ఈ ఆలోచనను ఆయన… pic.twitter.com/1JJXdemaV2 — TG Govt Updates (@TGGovtUpdates) July 3, 2026
दरम्यान हा व्हिडिओ @TGGovtUpdates नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत व्यक्तीची कला आणि त्याच्या प्रेमाची प्रशंसा केली आहे. एका यूजरने म्हटले की, “यालाच खरे प्रेम म्हणतात: जेव्हा तुम्ही एखादी समस्या पाहता आणि स्वतःच त्यावर उपाय शोधता”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पत्नीसाठी केलेला हा जुगाड खरंच कौतुकास्पद आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “वय वाढलं तरी प्रेम कमी झालं नाही… उलट आणखी सुंदर झालं”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






