(फोटो सौजन्य: Instagram)
काय आहे प्रकरण?
माहितीनुसार, दिल्ली रेल्वे स्थानकावर ५ किन्नारांच्या ग्रुपने एका पुरुषावर हल्ला चढवला. त्यांनी त्याला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. हद्द तर तेव्हा पार झाली जेव्हा मध्यस्ती पडलेल्या व्यक्तीच्या पत्नीला आणि मुलीलाही त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. अश्लील शिवीगाळ आणि अर्धनग्न होत त्यांनी रेल्वे स्थानकावर धिंगाणा घालायला सुरुवात केली. मुख्य म्हणजे आजूबाजूची लोक हा सर्व प्रकार खुल्या डोळ्यांनी बघत होते पण कुणीही यात हस्तक्षेप केला नाही.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक किन्नर रेल्वे स्थानकात आपले कपडे काढत अर्धनग्न होते. जेव्हा घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल होतात तेव्हा त्यांच्यावरही ही किन्नर हल्ला करते. टाळी वाजवत ती पोलिस अधिकाऱ्यालाही शिवीशाप देऊ लागते. दरम्यान सोशल मिडियावर ही घटना पाहून आता यूजर्सचा राग अनावर झाला आहे. त्या पाचही जणांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती नेटिझन्स करत आहेत.
View this post on Instagram
सदर घटनेचा व्हिडिओ @savegeworld नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. अनेक यूजर्स व्हिड़िओतील दृष्यो पाहून संतापले असून कमेंट सेक्शनमध्ये त्यांनीआपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यात एका यूजरने म्हटले की, “भारतीय रेल्वेने यावेळी लिंगाच्या आधारे भेदभाव करू नये”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जेव्हा आरपीएफ, जीआरपी आणि रेल्वेमध्ये लाचखोरी सुरूच राहील, तेव्हा सामान्य माणूस सुरक्षित कसा राहील?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “हे चुकीचं आहे… ट्रान्स रोड्सवर त्यांची दादागिरी खूप वाढली आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






